मुखपृष्ठ | रत्नागिरी उपकेंद्र | विद्यापीठाविषयी | दूरस्थ आणि मुक्त शिक्षण | स्टाफ लोगीन | संपर्क साधा | करिअर शोधा :

  चित्र
  सुविधा,प्रयोगशाळा इत्यादी
  ग्रंथालय
  पदविका
  संशोधन
  वार्षिक माहिती
  चर्चासत्र आणि कार्यक्रम
  नोकरी
  शैक्षणिक कर्मचारी वर्ग
  व्यव्स्थापक कर्मचारी
  फोटो गॅलरी
  माजी विद्यार्थी

कला शाखा > शैक्षणिक विभाग
ग्रंथालय

मुंबई विद्यापीठाची दोन ग्रंथालये आहेत; जवाहरलाल नेहरू ग्रंथालय विद्यानगरी आणि फोर्ट ग्रंथालय. तेथे ४५००० पुस्तके आणि ८ नियतकालिके आणि इ-दैनिके आहे.

काही विशेष सुविधा

१. विद्यार्थ्यांसाठी वाचनालय   

एम.एड., एम.फिल., पीएच.डी चे प्रबंध आणि शैक्षणिक पदव्युत्तर पदविका प्रकल्प, अहवाल वाचनालयात संदर्भासाठी उपलब्ध आहेत. विभागाच्या ग्रंथालयाकडे ५०० प्रबंध/ प्रकल्प/ अहवाल आणि १०० पुस्तके विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी संदर्भ म्हणून उपलब्ध आहेत.

२. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी संगणक कक्ष आणि इंटरनेट सुविधा  

विभागाकडे सक्षम असे संगणक कक्ष आणि इंटरनेट सुविधा कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी उपलब्ध आहे.

३.प्रयोगशाळा 

अ) शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय प्रयोगशाळा - शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत.

ब) शैक्षणिक मानसशास्त्रीय प्रयोगांसाठी प्रयोगशाळा - शैक्षणिक मानसशास्त्रीय प्रयोगांसाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत.

क) शैक्षणिक तंत्रज्ञानासाठी प्रयोगशाळा - विभागाकडे सक्षम आणि सुसज्ज अशी शैक्षणिक तंत्रज्ञान प्रयोगशाळा. संगणक, ओ.एच.पी., दूरदर्शन, इ. तंत्रज्ञान कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत.

४. संशोधन पत्र वाचन

संशोधकांना एक मंच देऊन त्याविषयी संशोधन पत्र वाचन सत्र प्रत्येक महिन्यात आयोजित केले जाते. 

५. अहवाल तयार करणे 

१) संशोधन पत्र वाचन सत्राचे अहवाल दरवर्षी तयार केले जातात.

२) विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रे/ शिबीरे यांचा अहवाल तयार करण्यात येतो.

३) विभागाची प्रकाशने

       मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक संशोधन (१९८१)

       मुंबई विद्यापीठातील ८० च्या दशकातील शैक्षणिक संशोधन (१९९३)

       शैक्षणिक हस्तपुस्तिका संशोधन साधने(२००२) 

  ही प्रकाशने प्रतिभागी, शोध मार्गदर्शक आणि शैक्षणिक महाविद्यालयात हस्तांतरित केलेली आहेत. 

१. विभागातर्फे पुढील अभ्यासक्रम भविष्यात सुरू करण्याचा मानस आहे-  

उच्च शिक्षणातील शिकवण्याचे तंत्रज्ञानाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

२. संशोधन कार्य आणि प्रशासकीय कामकाजाचे संगणकीकरण 

३. खालील विषयांवरील संशोधन प्रकल्प सुरू करण्याची योजना

  • शैक्षणिक मानसशास्त्र.
  • शिक्षक शिक्षण.
  • शिक्षण व्यवस्थापन.
  • उच्च शिक्षण.
  • स्त्री शिक्षण.
  • शिक्षणाचे अर्थशास्त्र.

इतर विभागांबरोबर, महाविद्यालयांबरोबर, आणि संस्थांबरोबर विभागानी भागीदारी केलेली आहे. आंतरविभागीय कार्यक्रम / प्रकल्प शिक्षकांनी सुरू केले आहे.

शैक्षणिक विभागाचे भागीदार

                १.       शैक्षणिक कर्मचारी महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ यांसह नूतन शैक्षणिक अभ्यासक्रम याचे डिसेंबर १९९५, मार्च १९९६, मार्च १९९७, आणि मार्च १९९८ मधे आयोजन केले.

           २.       राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ यांसह राज्यशास्त्रातील संशोधन पध्दती या विषयावर तीन शिबीरे जून १९९५, डिसेंबर १९९६ आणि जून १९९८. रोजी आयोजित केली.

         ३.       यू.जी.सी. प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षकांना प्रशिक्षणाची योजना यांसह दोन प्रशिक्षण शिबीरे ऑगस्ट १९९७, रोजी आयोजित केली.

        ४.       पदवी महाविद्यालयातील समाजशास्त्राच्या शिक्षकांसाठी समाजशास्त्र अभ्यासक्रम समिती यांसह चर्चासत्र प्रशिक्षण शिबीर आयोजित केले.




संबधित मुददे