प्रस्तावना
शैक्षणिक विभाग
शैक्षणिक विभागाची स्थापना १९७४ साली आणि हा विभाग मौलाना अब्दुल कलाम आझाद भवन, विद्यानगरी, सांताक्रूझ(पू),मुंबई – ४०००९८. ह्या विभागातर्फे शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबरोबरच पी.एच.डी अभ्यासक्रमही आहेत.
विभागाचा दृष्टिकोन
उत्कृष्ट शिक्षकांची परंपरा असल्यामुळे; भविष्यात अधिक सक्षम शिक्षक घडवणे.
विभागाचा उद्देश
समाजात आपली भूमिका बजावताना आमचे विद्यार्थी प्रभावी आणि वैचारिक दृष्टिकोन ठेवणारे,सतत शिकत राहणारे,प्रश्न सोडवताना ज्ञानाची कास धरणारे व्हावेत.
विभागाची ध्येये:
शैक्षणिक विभाग प्रयत्न करत आहे की;
-
शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि दर्जात्मक शिक्षण देणे. शिक्षण अनुशासनात एक सैध्दांतिक आधार देणारा शिक्षक आणि प्रशिक्षकांचा असा समुदाय तयार करणे जो विश्लेषणात्मक तपास करून आपल्या संबधित क्षेत्रात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करू शकेल.
- विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशिक्षकांमध्ये संशोधनात्मक विचार प्रणालीचा विकास करणे, संशोधनात्मक पध्द्तीत त्यांना प्रशिक्षित करणे; संशोधन करण्यास प्रवृत्त करुन मार्गदर्शनाने त्यांचे कौशल्य वाढवणे.
- मध्यम स्तरावर शैक्षणिक व्यवस्थापकांना स्वत:ला आणि त्यांच्या अधिपत्याखालील शिक्षण संस्थांना प्रभावीपणे सांभाळण्यासाठी प्रशिक्षित करणे.
- इतर शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रातील संशोधन पध्दती आणि शिक्षण व्यवस्थापन ह्या गोष्टी पाहणे.
- शिक्षण क्षेत्रात संशोधन करणे आणि मार्गदर्शन करणे.
संस्थेचे भौगोलिक स्थान:
शैक्षणिक विभाग
मौलाना अब्दुल कलाम आझाद भवन,
विद्यानगरी, मुंबई विद्यापीठ,कलिना
सांताक्रूझ(पू), मुंबई – ४०००९८
महाराष्ट्र.
दूरध्वनी नंबर :+९१२२ - २६५२६२२६
दूरध्वनी क्र.- +९१२२ – २६५२६२२६
|