अभ्यासक्रम > कला >शैक्षणिक क्षेत्र पदवी(बी.एड्.)(शारिरिक शिक्षण)

शैक्षणिक क्षेत्र पदवी(बी.एड्.)(शारिरिक शिक्षण)

किमान प्रवेश पात्रता (०.३३२०)

सदर अभ्यासाक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेची पदवी या विद्यापीठातून वा इतर मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबरीने त्याने:-

१) शारिरिक शिक्षण महाविद्यालयातून अभ्यासक्रमाव्यतिरिक्‍त दोन सत्रे पूर्ण करावी.

२) संस्था प्रमुखांच्या समाधानासाठी प्रात्यक्षिक कामाची दोन सत्रे ज्यात उमेदवार शिकेल:

अ)प्रात्यक्षिक व चर्चात्मक तासांना उपस्थिती.

१. आठवड्यात एकदा शिकवण्याचा अनुभव

२. गटांबरोबर कार्य

३. समाजोपयोगी निर्माणक्षमकार्य- दोन कार्यांचा अनुभव राज्य सरकारच्या प्रकल्पांपैकी.

४. इतर उपक्रमांत सहभाग/आयोजन

५. लिखित कार्य आणि दृक्‌श्राव्य शिक्षण.

ब) शिकवण्याचे निरिक्षण

क) सराव शाळेच्या मुख्याध्यापकांनी निवडून दिलेल्या माध्यमिक शाळांच्या इयत्ता ५ वी ते १० वी च्या वर्गांचे २५ तास घेणे,ज्यापैकी ५ तास हे लघुत्तम तास असतील.

ड) जे उमेदवार ११ वी व १२ वीला शिकवण्यास पात्र ठरतील त्यांना एक वा दोनही विशेष पध्दती शिकवण्याची परवानगी देण्यात येईल.