अभ्यासक्रम > कला > बी.एड्‌.(कर्णबधिरांसाठी)

बी.एड्‌.(कर्णबधिरांसाठी)
कमीत कमी प्रवेश पात्रता(०.३३२७)

सदर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराने या विद्यापीठातून वा इतर मान्यता प्राप्‍त विद्यापेठातून पदवी(कोणत्याही शाखेची) घेतली असावी.त्याव्यतिरिक्‍त:

१) एकापाठोपाठच्या दोन वर्षात,पहिला व दुसरा असे दोन सलग आणि वेगवेगळे टर्म्स,बी.एड्‌. महाविद्यालयाद्वारा किंवा विशेष शिक्षण महाविद्यालयातून भरणे गरजेचे आहे.
२) विद्यार्थी उमेदवार ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे,तेथीन संस्थाप्रमुखांची समाधान पूर्ती होण्याइतपत चिकित्सालयीन प्रात्यक्षिक कार्य तसेच शैक्षणिक प्रात्याक्षिक कार्य त्याने करावे. दोन सत्रभर या चिकित्सालयीन प्रात्यक्षिक कार्याच्या कालावधीचा विस्तार असावा.

या प्रात्यक्षिक कार्यात पुढील गोष्टींचा अंतर्भात असणे आवश्यक आहे.

अ) किमान १० अध्यापन प्रात्यक्षिके व पाठचर्चेस हजेरी

ब) जसे निदेशन लाभले आहे, त्यानुरुप अध्यापन तंत्र वापरण्याविषयी काटेकोर राहणे

क) प्राचार्यांनी सरावशाळा म्हणून निवड इयत्तांमधून आलटून घ्यावीत. तसेच त्यात(भाषा-विकास, शालेय क्रमिक विषय, भाषण अध्यापन, आणि श्रवण प्रशिक्षण) अशा विशेष शिक्षण विषयांचा अंतर्गत असावा.