अभ्यासक्रम > कला> कला शाखा पदवी (बी.ए.)

कला शाखा पदवी (बी.ए.)

(त्रैवार्षिक अभ्यास)
किमान प्रवेश पात्रता (०.२१३८)

सदर अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याने माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाच्या विविध वर्गीय मंडळातून घेतलेली उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा(१२वी)पुढील विषयांत उत्तीर्ण केलेली असावी:-
१. इंग्रजी
२. कोणतीही आधुनिक भारतीय भाषा किंवा कोणतीही परदेशी भाषा किंवा शास्त्रीय भाषा.
३. १०० गुणांचे कोणतेही चार विषय

किंवा

’माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य’ यांच्या वर्गीय मंडळातून घेतलेली ’उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा’ (१२वी) व्यावसायिक विषयांसह पुढील विषयांतून उत्तीर्ण केलेली असावी.
१. इंग्रजी
२. २०० गुणांचे कोणतेही दोन व्होकेशनल विषय
३. १०० गुणांचे कोणतेही तीन विषय

किंवा

’माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य’ यांच्या वर्गीय मंडळातून घेतलेली ’उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा’ (१२वी) व्यावसायिक विषयांसह पुढील विषयांतून उत्तीर्ण केलेली असावी.
१. इंग्रजी
२. कोणतीही भारतीय वा परदेशी वा शास्त्रीय भाषा
३. सामान्य पायाभूत अभ्यासक्रम
४. ३०० गुणांचे व्यावसायिक अभ्यासक्रम विषय

किंवा

इतर विद्यापीठातून सममूल्य परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.